हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यात पैनगंगा नदीला पूर आल्याने सर्वत्र नदी नाले भरून वाहत आहेत. नदीच्या पुराचे पाणी पिंपरी गावच्या रत्स्यावर आल्याने कामारी ते पिंपरी गावचा तीन दिवसापासून संपर्क तुटला आहे. दरम्यान पिंपरीच्या कोंडाबाई पवार यांचा निधन झाल्याने आज अंत्यविधीसाठी आलेल्या 285 पाहुण्याने चक्क अर्धा किमी नावेतून प्रवास करून उपस्थिती लावली आहे. त्यामुळे येथील पुलासह रत्स्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दरवर्षी या गावचा पुराच्या पाण्याने संपर्क तुटतो यावर राजकीय नेते व शेणाने उपाय काढून पुलासह उंच मजबूत रास्ता करून द्यावा अशी मागणी केली जात आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला महापूर आला आहे. केदारनाथ कडून लाखाडी नदी ही कामारी जवळ पैनगंगेला येऊन मिळते येथे नदीचा संगम झाल्याने पैनगंगेचे पाञ भरले की लाखाडी नदीचे पाणी पाञात जात नाही. त्यामुळे कामारी जवळील लाखाडी नदी पुराच्या पाण्यामुळे ओव्हरफ्लो झाली असून, कामारी गावाला पुराणे वेढा घेतल्याने पुराचे पाणी विरसणी आणि पिंपरी – कामारी गावाकडे जाणारा रस्त्यावर साचल्याने तीन दिवसापासून येण्याजाण्याचा मार्ग बंद पडला आहे. पिंपरी कडून कामारीला येतांना नाल्याचे पाणी पुल नसल्याने रोडवर आल्याने संपर्क तुटला आहे. विरसणीकडूनही पिंपरीचा छोटा पुलावरुन पाणी जात असल्याने तीन दिवसापासून संपर्क तुटला असल्याने पिंपरीकराचे बेहाल होत आहेत. मागील तीन दिवसाच्या अतिवृष्टीने हिमायतनगर तालुक्यात पिकाचे मोठे नुकसान झाले असून, घराची पडझड झाली असून, नदीकाठावरील जमिन पाण्या खाली गेली आहे. कामारी व विरसणीच्या मध्ये भागी पिंपरी हे गाव असून, पिंपरीकर यांचा जगाशी संपर्क तुटला असून, गावची 70 टक्के जमिन पाण्याखाली गेली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पिंपरीच्या भूमिहीन कोंडाबाई जिवनाजी पवार ह्या 2 सष्टेंबरला स्वर्गवासी झाल्यामुळे अंत्यविधीसाठी येणार्या 285 पाहुण्यांना पुरामुळे चक्क होडीतून अर्धा किमी कामारी ते पिंपरी प्रवास करावा लागला आहे. अशी माहिती सरपंच गाडेकर व दिगांबर शिरफुले यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. यातून प्रवास करताना जीवमुठीत घेवून पाहुण्याना अंत्यविधीला हजर राहावे लागले आहे. मयत कोंडाबाई पवार यांना चार मुले व चार मुली ,सूना नातू,जावई, असा मोठा परिवार आहे.