नांदेड – जबरी चोरीच्या एका आरोपीस अटक करुन त्याचे कडुन ४४ ग्रॅम सोन्याचे ०३ गंठण असा एकूण ३ लक्ष २१ हजार ५२७ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाने हि कामगिरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ‘ऑपरेशन फ्लश ऑऊट’ अंतर्गत केली आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ‘ऑपरेशन फ्लश ऑऊट’ अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना मागील गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दि. ०४ सप्टेंबर २०२४ रोजी डी.वी. पथकाचे पो.उपनि. विनोद भा.देशमुख सोबत डी. बी. पथकाचे अमंलदार पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हद्दीमधील मालेगाव रोडने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गु.र.नं. २९१/२०२४ कलम ३०९(४),३(५) बी.एन.एस हा गुन्हा केलेला आरोपी हा मालेगाव ता. अर्धापुर जि.नांदेड येथील नांदेड स्पेशल आलु बिर्याणी या हॉटेलवर आहेत.
त्यावरुन वरील अधिकारी व अमंलदार असे सदर ठिकाणी जावुन एका इसमास पकडुन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मुकेश पिता गजानन कल्याणकर वय २४ वर्षे व्यवसाय मजुरी रा. देवीनगर, मालेगाव ता. अर्धापुर जि.नांदेड असे सांगितले. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकशी केली असता त्याने व त्याचे सोबतचे इतर आरोपी नामे गणेश दिलीप धवाले, राहुल जाधव व यश चितडवाड तीघे रा. शिवनगर, नांदेड यांनी वरील गुन्हा केला असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमाकडुन पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड २९१/२०२४ कलम ३०९ (४), ३ (५) बी.एन.एस. मधील दोन सोन्यांचे गंठण व पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गु.र.नं. २३९/२०२४ कलम ३९२, ३४ भा.दं. वि. मधील एक असे ०३ सोन्याचे गंठण ४४ ग्रॅम वजनाचे किमती ३ लाख २१ हजार ५२७ रुपये असा १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती किरितीका.सि.एम. , यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, पो.उपनि.विनोद. भा. देशमुख, पोहेकों गजानन किडे, पोहेकों प्रदिप गर्दनमारे, पोकों ओमप्रकाश कवडे, पोकों सुर्यभान हासे व पोकों नवनाथ गुट्टे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.