नांदेड| शेतकऱ्यांनो…सावधान…नांदेड पोलिसांनी काढलेल्या पत्रा प्रमाणे सणासमोर विम्याच्या रक्कमेसाठी आपल्यास खात्यात पैसे टाकण्याकरीता फ्रॉड कॉल करून आपल्याला OPT टाकुन पुन्हा OTP विचारणा करून आपल्या खात्यातील पैसे काढुन घेणारे सक्रिय होतील. यासाठी शेतकरी बांधवानी सतर्क राहणे गरजेचे असून, शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉल पासुन शेतकऱ्यांनो सावधान राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी केले आहे.
सध्या शेतीच्या पिक विमा बाबत योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन व योजनेच्या नावाखाली शेतकरी बांधवानो तुम्हाला एक कॉल येईल त्या कॉलच्या माध्यमातुन समोरचा व्यक्ती तुम्हाला (OTP) मागु शकतो. एखादी लिंक पाठवेल त्यावर लिंक करायला सांगेल किंवा एखादे एप्लीकेशन ओपन करायला सांगेल. जर तुम्ही सांगितलेल्या लिंकवर क्लिक केले किंवा (OTP) सांगीतला तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे बैंक अकाउंट देखील रिकामे होऊ शकते. म्हणुन जनतेने आणि विशेषतः शेतकरी खालील सुचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.
* अनओळखी मोबाईल क्रमांकावरून शेती विमा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन च्या नावाखाली कॉल आला त्यावर विश्वास ठेवु नये व आपली माहीती सांगु नका.
* शेती विमा संदर्भात तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी ओटीपी पाठवल्यास ते शेअर करू नका.
* शेतकरी बांधवानो या फसवणुकीबद्दल सावध व्हा, जेणेकरून त्यांना या प्रकारच्या फसवणुकीपासुन तुम्ही वाचाल.
* अशाप्रकारे आपल्या मोबाईल मधील अॅक्सेसची अनावश्यक परवाणगी मागणारे अॅप किंवा त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
तुमच्या सोबत अशा प्रकारची फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. सायबर शाखा टोल फ्रि नंबर 1930, असुन, राष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळ (http://cybercrime.gov.in/). सायबर पोलीस स्टेशन, नांदेड फोन क्रमांक 02462-24027, असा आहे. ईमेल-(cybercell.nanded@