नांदेड – श्री हनुमान जन्मोत्सव वर्ष (१६) वे प्रभाग क्रं ३ हनुमानगड कमाणी समोर श्री हनुमान जयंती निमित्त भव्य महाआरती व महाप्रसादाचे आयोजन भाजपाचे सक्रिय सदस्य इंजि. आकाश काशिनाथ पवार यांनी केले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री संजयभाऊ कौडगे यांच्या हस्ते आरती करून महाप्रसाद वाटपा ला सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थिती प्रभाग क्रं १० चे नगरसेवक प्रतिनिधी बाळुभाऊ खोमणे, नगरसेवक आशुतोष जोशी, नवा मोंढा मंडळ अध्यक्ष भालचंद्रभाऊ पवळे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस मधुकरदादा मानेकर, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अॅड रमेश धाञक, सोशल मिडिया मराठवाडा सहसंयोजक बाळुभाऊ लोंढे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सोशल मीडिया अक्षय अमिलकंटवार, नवा मोढा मंडळचे कोशाध्यक्ष गजानन कळके पाटील, करण इरकर, शिवा देवकर, योगेश पवार, अंकुश मांजरे, सुमित मुराडी, राम देवकर, कुणाल, देविदास मेटकर, श्याम देवकर, अदीसह मोठ्या संख्येने महिला भगिनी व रामभक्त यांनी उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेतला.
