हिमायतनगर – तालुक्यात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट सुरु आहे. पावसाने शेतकयांची झोप उजवली असुन चिंता वाढवली आहे, अस्मानी समकटाला दुर सारण्यासाठी देवाकडे प्रार्थणा करत आहेत परंतु देवावरही विज पडत असल्याने देवही सुरक्षीत दिसत नाही, घारापुर येथील हनुमान मंदिराच्या कळसावर सोमवारी रात्री वीज कोसळली. सुदैवाने मंदिर परिसरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही, शिखराचा काही भाग निखळला आहे. गावावरच संकट देवाने ओढवुन घेतल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
हिमायतनगर तालुक्यात सोमवारी रात्री ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट झाला. या दरम्यान घारापुर येथील हनुमान मंदिरावर वीज कोसळल्याने कळसाचा काही भाग निखळला. सुदैवाने या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने जीवितहानी झाली नाही.
स्थानिक वारकरी संप्रदायातील लोकांनी याला श्रद्धेचा रंग देत, “संकटमोचन हनुमानाने गावावरील संकट स्वतःवर घेतले,” अशी भावना व्यक्त केली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे निसर्गाचा प्रकोप सर्वत्र जाणवतो आहे. अश्या प्रकारे अधिक गावावर येणार मोठं संकट हनुमंत रायाने आपल्या अंगावर झेलून गावाची रक्षा केली त्यासाठी गावाबाहेर ठीक ठिकाणी संकट मोचन हनुमानाचे मंदिर असते अशी वारकरी संप्रदायातील व्यक्तींच व भगवन्तावर श्रद्धा आहे.
मागील महिन्यात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथील नागनाथ मंदिरावरही अशाच प्रकारे वीज कोसळून कळसाचा काही भाग कोसळला होता. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे गावकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सततच्या पावसामुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
