हिमायतनगर – महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा हदगाव विधानसभा निवडणूक रिंगणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिमायतनगर शहरात ठिकठिकाणी भेटी दिल्या. आमदार जवळगावकर यांचे शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी व समर्थक व्यापारी बांधवानी माधवराव पाटील जवळगावकर यांचा शाल व पुष्पहाराने स्वागत व पेढा भरून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी हिमायतनगर शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, बाजार चौक, चौपाटीसह शहरातील सर्व लहान मोठ्या व्यावसायिक दुकानदार तसेच नोकरदार बांधव, छोटे व्यापारी, हातगाडेवाले, फळविक्रेते, यांची आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. हिमायतनगर शहरात दाखल होताच सर्वप्रथम आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी वाढोणा शहराचे आराध्य दैवत श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन श्रीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. तसेच वडाच्या झाडाखालील मानाचा गणपतीचेहि त्यांनी दर्शन घेऊन सर्वांना सुखी, समाधानी व शेतकऱ्यांना उत्पन्नात भरभराटी दे… अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, सभापती जनार्धन ताडेवाड, शहराध्यक्ष संजय माने, रफिक सेठ, सुभाष दादा राठोड, सुभाष शिंदे, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, माजी नगराध्यक्ष कुणालभाऊ राठोड, काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोमावार, गोविंद बंडेवार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, फेरोजखान युसुफखान पठाण, डॉ प्रकाश वानखेडे, बाकी सेठ, योगेश चिलकावार, दीपक कात्रे, शिवसेना तालुका प्रमुख विट्ठल ठाकरे, बाळू आणा चवरे, अमोल धुमाळे, प्रकाश रामदिनवार, संदीप तुपतेवार, दत्तात्रेय तिमापुरे, श्याम जक्कलवाड, पंडित ढोणे, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, मन्नान भाई, सोपान बोंपिलवार, सचिन माने, आदींसह महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.