नांदेड/पुणे – गोविंद मुंडकर – कुमारी हृतीका प्रशांत जन्नावार हिसने LLM (एल एल एम) मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. सिंबोईसिस कॉलेज पुणे येथून शिक्षण पूर्ण केले असून, हिमायतनगर तालुक्यातुन उच्च पदवी मिळविणारी पहिली विद्यार्थिनी आहे. नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुण्यात पदवीदान सोहळा संपन्न झाला. त्यात तिला गोल्ड मेडल व पदवी प्रदान करून गौरविण्यात आले आहे. तिच्या यशाबद्दल नातेवाईक व सर्व क्षेत्रातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे.
कु.हृतीका ही डॉ. प्रशांत कुमार जन्नावार यांची द्वितीय कन्या असून, डॉ. प्रशांत हे स्व. डॉ कुमार जन्नावार यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांचे मूळ गाव हिमायतनगर आहे, सध्या ते अलिबाग येथे स्वतः चे हॉस्पिटल चालवीत आहेत. तसेच इंजिनियर प्रवीण कुमार जन्नावार हे त्यांचे धाकटे भाऊ आहेत, कुटुंबातील सर्व सदस्य उच्चशिक्षित आहेत. प्रवीण यांचा मुलगा अभिजीत MS करून सध्या सिडनी ऑस्ट्रेलिया येथे नोकरी करत आहे, तर मुलगी डॉ. गौरी BDS झाली आहे.
सदरील सुवर्णपदक महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु यांचे शुभहस्ते दि. ०३ सप्टेंबर पुणे येथे पदवीदान सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
तिने मिळविलेल्या यशाबद्दल माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार हेमांतभाऊ पाटील, विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, नागेश पाटील आष्टीकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, बाबुराव कदम कोहळीकर, डॉ अंकूश देवसरकर, डॉ रेखाताई चव्हाण, परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. के. आक्कलवाड, आर्यवैश्य समाजाचे तालुकाध्यक्ष सुरेश अप्पा पळशीकर, डॉ. सुरेश मामीडवार, डॉ. सुदाम पुप्पलवाड, डॉक्टर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ. दामोदर राठोड, श्यामभाऊ रायेवार, कमलाकर दिक्कतवार, परमेश्वर गोपतवाड, प्रमोद तुप्तेवार, यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिक, आर्य वैश्य समाजातुन अभिनंदन केल्या जात आहे.