हिमायतनगर – तालुक्यातील पोटा बु येथील शेतकरी ह.भ.प.रामराव संभाजी माने हे गेली चार दशका पासून उत्तम शेती करतात शेती सारख्या एकमेव उत्पन्नावर त्यातून त्यांनी परिवारातील एक माध्यमिक शिक्षक, एक कृषी अधिकारी तर एका सुनेला विक्री कर निरीक्षक बनविले असून गाव आणि परिसरात त्यांच्या परिवाराची संस्कारीत, धार्मिक, परोपकारी कुटुंब म्हणून ओळख आहे. अशा शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा नुकताच कुणबी मराठा संघा कडून समाजसेवक तथा उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सपत्नीक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
पोटा बु येथील रामराव संभाजी माने हे लहानपणापासून शेती करीत आले. घरी वडिलोपार्जित चांगली शेती असल्याने त्याचं मन त्यात रमल आणि काळानुसार त्यात नवनवीन अपेक्षित बदल करून ,आधुनिक औजार, तंत्रज्ञान त्याचं बरोबर शेणखताचा जास्त वापर करत या जोरावर उत्तम शेती करून आपल्या उत्पन्नात त्यांनी लक्ष गाठलं त्यामुळेच आपल्या संयुक्त कुटूंबाचा डोलारा अगदी सहज पेलाला. रात्रंदिवस मेहनत योग्य नियोजन आणि त्याला सार्थ साथ त्यांच्या अर्धागिनी सौ. शांताबाई रामराव माने लाभली त्यामुळे छोटा भाऊ माध्यमिक मुख्यध्यापक, मोठा मुलगा तालूका कृषिअधिकारी, तर सुनबाई विक्रीकर निरीक्षक पदापर्यंत मजल मारू शकल्या.
अशा या समाजातील रत्नाची पारख कुणबी मराठा महासंघ यांनी करून यांचा आदर्श समाजातील इतर लोकांनी घेऊन आदर्श कुटुंब काय असते याचे उदाहरण समजपुढे ठेवून अशा व्यक्तीचा सन्मान व्हावा या हेतूने त्यांना नांदेड येथील कुणबी मराठा स्नेहमिलन सोहळ्यात भक्ती लॉन्स येथे माजी खासदार भावना गवळी, प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, त्याचं बरोबर सत्कारमूर्ती व्यंकटेश जाधव, डॉ. राजेंद्र वानखेडे, गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते सहकुटुंब यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी गावातली दत्ता पवार, गजानन माने, गणेश माने बालाजी माने, तुकाराम गायके, संतोष पवळे , रामराव जाधव आबाराव माने, उत्तमराव माने, कृषी अधिकारी पुंडलिक माने व ज्ञानेश्वर माने हे उपस्थित होते.