भोकर/नांदेड – तालुक्यातील भोसी येथे माजी जी. प. सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्या सोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी अशोक चव्हाण म्हणाले; की, मी व माझे कुटुंबिय आणि भोकर तालुका यांच अगदी जवळच नात असून माझ्या वडिलांना म्हणजेच स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांना देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत आणि मला राज्याचा मुख्यमंत्री बनविण्याची किमया या भोकर मतदारसंघानी केली आहे त्या मुळे या मतदार संघातील जनतेचे आम्ही उपकार विसरू शकत नाही तेंव्हा या मतदार संघांच्या विकास कामासाठी मी निधी कधीच कमी पडू देणार नाही, विकासाच्या कामामध्ये कोणी आडवा आला तर त्याचा मुकाबला अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही असे मत माजी. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशा वेळी बोलताना मत मांडत गट तट बाजूला ठेवून मतांचे ध्रुवीकरण होऊ देऊ नका व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या समोर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून श्रीजया अशोक चव्हाण येणार असून तिला प्रचंड मताधिक्यानी विजयी करा असे भावनात्मक आव्हान केले.
पक्ष प्रवेशात माजी सभापती जी. प. स. प्रकाश देशमुख भोसीकर, माजी सभापती शिवाजी देवतुळे, माजी उपसभापती मारोती झंपलंवाड, माजी संचालक धोंडिबा भिसे, व भोसीकर यांचा सहभाग महत्वाचा ठरला. भोसी गटातील असंख्य समर्थकांनी दि. ४ सप्टेंबर बुधवारी फार्म हाऊस वर खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. चव्हाण कुटुंबाच या भागावर पूर्वीपासून किती लक्ष आहे हे सांगताना हा भाग सुजलाम सुफलाम करण्यामागे एकमेव स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत व्यक्त केले तर भोसी जी. प.सर्कल मध्ये बहुसंख्य गाव हे आदिवासी आहेत २२ पैकी १२ गाव हे आदिवासी गाव आहेत व ते अतिशय मेहनती व कष्ठाळु असून येथिल शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्याकरिता डोरली, बोरवाडी येथे तलावाची अत्यंत आवश्यकता असल्याने ते करून द्यावेत त्याचं बरोबर अनेक शाळा ह्या जुन्या झाल्याने त्याना नवीन इमारतीच्या बांधकामची मान्यता मिळवून द्यावी अशी मागणी यावेळी प्रवेशकर्ते प्रकाश देशमुख यांनी केली.
यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी देखील भाजपा मध्ये प्रवेश घेतला त्यावेळी मंचावर माजी आमदार अमिताताई चव्हाण, अमर राजूरकर, सभापती जगदीश पाटील भोसीकर, श्रीजया चव्हाण, मंगारांनी अंबुलगेकर, माजी. जी. प. अध्यक्षा , माजी. जी. प. सदस्य दिवाकर रेड्डी, भगवान दंडवे, रामचंद्र मुसळे, दिलीप देशमुख सोमठाणकर, भोसीच्या सरपंच सौ.ताराबाई देशमुख, किशोर पाटील लगळूदकर, गणेश कापसे, शेख युसूफ, डॉ. फेरोज इनामदार आदींची उपास्थिती होती.