हिमायतनगर – तालुक्यातील पवना शिवारात असलेल्या देवकृपा गोशाळा गोविज्ञान केंद्रास मुंबई येथिल श्री आदी जिन सेवा फाऊंडेशन मुंबई कडुन गोरक्षणाच्या कार्यात हातभार लावत उन वारा पाऊस या पासुन गाईंच रक्षण होण्यासाठी भव्य शेड बांधकामा करीता निधीची पुर्तता केली होती, त्या शेडचा गोर्पण सोहळा दि. २ रविवारी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रास्ताविकात किरण बिच्चेवार माहिती देतांना म्हणाले ; श्री आदी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांची गोशाळेच्या यशामध्ये मोठी भुमिका राहिली आहे. आज पर्यंत गोशाळेला मोठे चारा गोदाम, संपुर्ण गोशाळेला कंपाऊंड, मोठे चाप कटर, अभयदान , रिपर आणि वेळोवेळी चाऱ्यासाठी आमच्या मदतीला श्री आदि जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट धावुन आलेली आहे. श्री आदी जीन युवक चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रयत्नातून आज या ६० बाय १०० आकाराच्या शेडचे अनावरण सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. श्री आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई हि संस्था महाराष्ट्र गुजरात मधील तळागाळातल्या गोशाळांना सढळ हाताने मदत करून गो सेवेच्या कार्यास प्रोत्साहन देणारी महाराष्ट्रातली एकमेव मोठी संस्था आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना जयेशभाई शाह म्हणाले ; किरण बिच्चेवार आणि त्यांचे कार्यकर्ते अतिशय प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत आपला जिव धोक्यात घालून गोरक्षणाची चळवळ चालवत आहेत. अशाप्रकारचे काम सबंध महाराष्ट्रात पहावयास मिळत नाही. आम्ही बिच्चेवार यांच्या गोसेवेच्या व गोरक्षेच्या कार्यासाठी त्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

मा. श्री उद्धवजी नेरकर, सदस्य, गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या मनोगतामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये किरण बिच्चेवार यांनी सुरू केलेली अलौकीक गोरक्षणाची लढाई आज महाराष्ट्रात ” नांदेड पॅटर्न ” म्हणुन लवकरच नावारूपाला आलेली पहावयास मिळेल असे सांगितले. गोसेवा आयोग सदैव किरण बिच्चेवार यांच्या सोबत असुन ते अतिशय चिकाटीने कायद्याच्या चौकटीत राहुन गोरक्षणाचे कार्य करतात त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गोरक्षक कार्यकर्त्यांचे विमा संरक्षण गोसेवा आयोग लवकरच करणार आहे, असही त्यांनी सांगितल.
क्षेत्र गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद भाऊरावजी कुदळे बोलतांना म्हणाले, सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गोवंशाचा अखेरपर्यंत सांभाळा केला पाहिजे, गोवंश हे आपले खरे धन असून आज शेणखताला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. आणि त्या तुलनेमध्ये बाजारात शेणखत मिळत नाही, भविष्यात शेण चोरीला जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. गोवंशावर आधारित शेती चा प्रचार आणि प्रसार गावागावात झाला पाहिजे. जेणेकरून आपल्याकडील अनमोल गोवंशाचा ठेवा कसायांच्या हाती लागणार नाही. पोलीस आमचे दुश्मन नाहीत त्यांनी स्वयंस्फुर्तपणे कायद्याची अंमलबजावणी करावी. तसेच कसाई देखील आमचे दुश्मन नाहीत त्यांनी गोहत्तेचा धंदा बंद करून इतर धंद्याचा स्वीकार करावा असे झाले तर संघर्ष होणारच नाहीत. गोरक्षा करण्यापेक्षा गोरक्षणातुन वाचवलेल्या प्राण्यांचे संगोपन करणे खूप खर्चिक झालेले आहे. एवढी मोठी जबाबदारी पार पाडताना किरणला झोप कशी लागते की असा मला प्रश्न पडला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी किरण बिच्चेवार यांच्या पाठीशी उभे टाकले पाहिजे.
यावेळी यवतमाळ, लातुर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील गोशाळा संचालक, गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
