हिमायतनगर, गोविंद गोडसेलवार| आगामी गौरी गणेशोत्सव, दुर्गात्सव काळात नुसते देखावे साजरे न करता सामाजिक उपक्रम राबविण्यावर मंडळांनी भर द्यावा. उत्सवाच्या काळात देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधनात्मक संदेश देऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा. आणि हिमायतनगर शहराची हिंदू – मुस्लिम एकतेची परंपरा कायम ठेऊन धार्मिक सन उत्सव सर्वानी एकोप्याने साजरे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. असे अवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले.
ते हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी पोलीस प्रशासनाकडुन अनेक महत्त्वपूर्ण सुचना देत असताना पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी सर्वानीच घ्यावी असे अवाहन केले. या महत्त्वपूर्ण बैठकीला तहसीलदार श्रीमती टेमकर, नगरपंचायत प्रशासनातील ओएस महाजन, पोलीस उपनिरीक्षक नीता कदम, महावितरणचे पवन भडंगे, मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, मारोती हेंद्रे, बाळू हरडपकर यांची उपस्थिती होती.
यावेळी गणेह्स मंडळाच्या युवकांनी शहरातील खड्डेमय रस्ते, वीज पुरवठा आणि ठिकठिकाणी रत्स्यावरील अतिक्रमण हटवून रास्ता मोकळा करून मंडळांना सहकार्य करावे अशी मागणी केली. त्या संदर्भात नगरपंचायत, महावितरण विभागाच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर आपल्या मनोगतात म्हणाल्या की, आगामी काळात गणेशोत्सव व दुर्गात्सव हे महत्वाचे धार्मिक सन आपणाला साजरे करावयाचे आहेत. कुण्याही जाती धर्माच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी आपण सर्वानी घ्यावी. प्रशासकीय यंत्रना सर्व प्रकारे सजग आहेत. आपण सर्वांनी धार्मिक सन उत्सव काळात जागरूक राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार श्रीमती टेमकर यांनी केले. यावेळी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांचा पुष्पहाराने सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी स्वागत सत्कार करून अभिनंदन केले.