नांदेड – महाराष्ट्रातील जनतेने २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भरभरून दिलेल्या आशिर्वादाबद्दल महायुतीच्या या महाविजयाचे शिल्पकार राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब हे जनतेचे आभार मानण्यासाठी नांदेड शहरात येते आहेत हि आभार यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. गुरुवार,दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी नांदेड मार्केट कमिटी मैदान नवीन मोंढा येथे आभार यात्रा जाहीर सभा आयोजित केली आहे. त्यानिमित्त नांदेड जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख शहरप्रमुख महिला आघाडी जिल्हाप्रमुख व सर्वच शिवसेना पदाधिकारी यांची आढावा बैठक व पत्रकार परिषद हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) तथा आमदार हेमंतभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथील हॉटेल विसावा येथे पार पडली .
या बैठकीत आगामी सभेच्या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्यांना कामाबाबत सक्तीच्या सूचना दिल्या कोणीही कामात हलगर्जीपणा करू नये याबाबत निर्देश दिले. तसेच त्यांनी काय- काय नियोजन करायचे याबाबत माहिती दिली . महसूल पंधरवाडा साजरा करायचा असून मा. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्व सामान्य जनतेला आवश्यक असणारी शासकीय कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून दिली. त्यामुळे मा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपणास हा पंधरवाडा हा महसूल पंधरवाडा म्हणून साजरा करायचा आहे. हा तसेच यावेळी पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या .

या बैठकीला आमदार आनंदराव बोंढारकर ,आमदार बालाजी कल्याणकर, संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार, जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, जिल्हाप्रमुख विनय गिरडे, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख , तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे, सुदर्शन नाईक, बालाजी मुरकुटे, संतोष पाटील कुरे, संतोष कपाटे, अमोल पवार,, बाबाराव रोकडे, बालाजी कानबुरकट ,मिलिंद पवार, सुभाष पेरेवार, बाबुराव कवळे,गंगाधर तमळूरकर, ता. प्रमुख राम ठाकरे, संतोष भारसावडे , सनदी अधिकारी बालाजी पाटील खतगावकर डॉ. अंकुश देवसरकर ,सहसंपर्कप्रमुख दर्शनसिंग सिंधू, उपजिल्ह्प्रमुख सचिन किसवे , महानगरप्रमुख राजू गुंडावार ,शहरप्रमुख तुलजेश यादव, उमेश दिघे, श्याम पाटील वानखेडे, मंगेश कदम, श्याम कोकाटे, अशोक उमरेकर ,गुरमितसिंग तमान्ना, शंकर पिनोजी प्रा. कैलास राठोड, वैजनाथ देशमुख ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख शीतलताई भांगे, गीताताई पुरोहित, वनमालाताई राठोड, स्नेहा पाटील , लक्ष्मीबाई दुधे, अपर्णाताई नेरळकर ,आम्रपल्लवी शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
