हिमायतनगर – सर्व आदिवासी कोळी महादेव समाजाच्या न्याय हक्कासाठी समाज संघटनेची हिमायतनगर येथिल महात्मा फुले सभागृहात दि. ४ सप्टेंबर बुधवारी बैठक झाली, या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन एका अधिकाऱ्यांसाठी आदिवासी कोळी महादेव समाजाच्या विरोधात भूमिका घेऊन आ जवळगावकर यांनी सर्व समाजाची नाराजी ओढून घेतली आहे. त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देऊन त्यांच्या पत्रव्यवहार प्रकरणाचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी मोठया प्रमाणावर आदिवासी कोळी महादेव समाजाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेन्द्र भारुड यांच्यावर सह्याद्री बंगल्यावर आयोजित दि.६ जुलै २०२४ रोजी बैठकीत आयुक्त डॉ. भारुड संविधानिक बाजु शासनापुढे मांडली परंतु काही सामाजिक संघटनेच्या कार्यकत्यांनी त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करत त्या पदावरून बदलीची मागणी केली. परंतु डॉ भारुड यांचे कार्य आदिवासी विकास विभागासाठी महत्वपूर्ण आहे त्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेउन त्यांची बदली होऊ न देता त्याच पदावर कायम ठेवावे जेणेकरून माझ्या मतदार संघातील आदिवासी बांधव यांचे अनेक विकास कामे होण्यास नक्कीच मदत होईल.
असे पत्र हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिल आहे, त्यामुळं हदगाव हिमायतनगर तालुक्यातील तमाम आदिवासी महादेव कोळी समाजाने हिमायतनगर शहरात दि. ४ बुधवारी १२:०० वाजता हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृह येथे बैठक संपन्न झाली. या संयुक्त बैठकित आमदार जवळगावकर यांनी दिलेल्या पत्राचा निषेध करण्यात आला. समाजाच्या न्याय हक्कासाठी एकवटलेल्या आदिवासी कोळी समाजाच्या विरोधात भूमिका घेतल्याने आमदार जवळगावकर यांना त्या पत्राचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील असा इशारा बैठकीत कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
याचबरोबर सदर बैठकीमध्ये समाजाच्या विविध अडचणी बाबतीत चर्चा करण्यांत येऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय, हदगांव येथे सादर करण्यांत आलेल्या जातीचे प्रमाणपत्रा बाबत व नविन प्रमाणपत्राकरीता सादर करण्यांत येणार संचिकेबाबत विचार विनिमय करण्यांत आला. तसेच आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या बदली न करण्यांसंबंधी पत्र व्यवहार केला त्याबाबत चर्चा करण्यांत आली. या बैठकीला सर्व आदिवासी कोळी समाज बांधव हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात जमले होते. यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर देखील सखोल चर्चा झाली.
यावेळी माधवराव ल्याहरीकर, रामेश्वर पिटलेवाड, नामदेव बोईनवाड, नारायण सादलवाड, प्रकाश मुद्दनवाड, पिल्लेवाड, गुरगुटवार गुंडेवाड, भंडरवाड, बोईनवाड, चिंतलवाड, दासरवाड, करडेवाड, दारेवाड, नांदेड, भोकर, मंगरूळ, टेंभी, सिरंजनी, एकंबा, कांडली, पारवा, राजवाडी, हिमायतनगर, हदगाव, खरटवाडी, लिमगाव ल्याहरी, तामसा सर्व गावातील समाज बांधव उपस्थित होते.
भारुड यांनी आदिवासी कोळी समाजाला मुख्यमंत्र्याच्या बैठकीमध्ये बोगस म्हणल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता.