कार्यकर्त्यांना आज पासुनच कामाला लागण्याचा सल्ला
हिमायतनगर – (सुनिल दमकोंडवार) होवु घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जातांना कार्यकर्त्यांनी आता पासुन कामाला लागावे, गत पाच वर्षात इच्छुकांनी काय कामे केलीत याची माहिती घेण्यात यावी, लोकांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींना निवडणुक रिंगणात उतरवुन जनतेने शहराचा विकास साधण्यासाठी जातीपातीचा विचार न करता चांगल्या माणसांना मदत करून निवडुन आणाव, हिमायतनगर नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे असे सुतोवाच विधानपरिषद आमदार हेमंतभाऊ पाटिल यांनी येथे केले. नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकांची बैठक येथिल साईबाबा मंदिर परीसरात संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
व्यास्पीठावर आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी जि.प. उपाध्यक्ष गंगाधर पाटिल चाभरेकर, माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, संभाराव लांडगे, युवा सेना जि. प्रमुख संदेश पाटिल, महिला आघाडी जि. प्र. शितलताई भांगे, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे , युवासेना ता. प्रमुख ज्ञानेश्वर पुट्ठेवाड, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पाटिल म्हणाले, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, यांच्या विचाराने प्रेरीत झालेले स्व. आनंदराव दिघे, यांच्या निचारांचा वारसा चालवणारे मा. मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे पावलावर पाऊल टाकणारे आपण सर्व शिवसैनिक कुठेही जातीपातीला थारा न देता जनसेवे करीता एकत्र येण गरजेच आहे, सर्वजन एकत्र आले की असाध्य ते साध्य होते.
शहरात अस्वच्छ वातावरण वराहांचा वावर असतो आरोग्याच्या दृष्टीने हि बाब चांगली नाही, सुंदर सुसज्ज शहर निर्माण करण्यासाठी सर्वांचा पुढाकार असन जरूरीच आहे, चांगल्या कामात पुढाकार घेणारांना सहकार्यकेलच पाहिजे. ती संधी आता उपलब्ध झाली असुन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार आहे येणाऱ्या काळात सर्व कामे पुर्ण होतील. असही हेमंत पाटिल म्हणाले.

आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला, शहर विकासासाठी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा भडकवण्याच आवाहन केल.
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हि बैठक महत्त्वाची ठरली.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक राम नरवाडे, विलास वानखेडे, विजय वळसे, रामदास भडंगे, ज्ञानेश्वर माने, गजानन गोपेवाड, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्ती, सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार, शिवसैनिक, आदिंची उपस्थिती होती.
