हिमायतनगर – सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस धो धो कोसळला, काहीतास विज गुल होवुन जनजीवन विस्कळित झाले, शहरातील नाल्या तूडूंब भरल्यानंतर शहर , गावे जलमय झाले होते तर दुचाकी, वाहनांना रस्ता देखील दिसत नव्हता ऐवढा पाऊस रस्त्यावर वाहु लागला तर ग्रामीण भागातील नाल्यांना पूर वाहू लागला परीणामी जनजीवन विस्कळित झाले होते.
हिमायतनगर तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखालीच असुन सोयाबीन पिके जाग्यावर काळे पडले आहेत. तर कापसाचे लागलेली पाती देखील सततच्या पावसामुळे गळून गेली असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने हिमायतनगर शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले होते बाजार चौक,सराफा लाईन, चौपाटी सह इतर मुख्य रस्त्यावर पाणी वाहू लागले असल्याने दुचाकीस्वारांना पाण्यातुन गाडी काढणं मुश्कील बनले होते तर बाजार चौकातील दुकानात पाणी शिरल्याने पावसामुळे व्यापाऱ्यांना दुकाने बंद करावी लागली.
हिमायतनगर शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात अगोदर देखील पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी देखील नगरपंचायत प्रशासनाकडून नाल्यांचे खोलीकरण पाणी शहराबाहेर काढण्यात अपयशी ठरत आहे. व्यापारी धर्मपुरी गुंडेवार, शाम जन्नावार, इंगळे, जनार्दन मुठेवाड, यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरले आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही नगरपंचायत च्या दुर्लक्षामुळे बाजार चौकातील दुकानात पाणी शिरत असल्याचा आरोप केला आहे.
शेतकऱ्यांचे हाती येणारे पिक पावसातुन चिखलात दत्त मनुन उभ आहे, उभ्या पिकावर काजळी चढली असुन सोयाबिनला कोंब येत असल्याच दिसुन येते, हातची पिके भुईत जाण्याची भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. महसूल प्रशासनाने अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतीचे अगोदरचे पंचनामे शासन दरबारी पोहच केले नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या लाभा पासुन दुर आहे. हिमायतनगर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाला असुन नदी काठच्या शेतकऱ्यांसह नाल्या काठच्या जमिनीमध्ये एकही पिक हाती लागणार नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असतांना एकाही मंत्र्याचा दौरा या भागात झाला नाही.
