हिमायतनगर – तालुक्यातील सरसम येथिल माहेर नांदेड येथे सासर असलेल्या डॉ. क्रांती यांची शैक्षणिक प्रगती पाहता त्यांची परदेशात डेनमार्क येथे डॉक्टरेट फेलो पदी नियुक्ती झाल्याच तेथिल संस्थेन कळवल आहे, यामुळे त्यांनी केलेल्या मेहनतीच चीज झाल्याच समाधान आई वडील नातेवाईकांना आहे.
सरसम येथिल शेतकरी सदाशिव कांबळे , माजी सरपंच सयाबाई कांबळे यांची मुलगी डॉ क्रांती ह्यांच शिक्षण १ली ते ७ वी जि. प. कन्या शाळा भोकर, ८ ते १० सरस्वती विद्या मंदिर भोकर, ११ वी ते १२ वी शाहु महाराज ज्युनियर कॉलेज भोकर, बिटेक इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन एसजीएस कॉलेज नांदेड, एमटेक इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन व्हीजेटीया कॉलेज मुंबई, पिएचडी इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन व्हीएनआयटी कॉलेज नागपुर येथे पुर्ण करून त्यांनी यशस्वी शिक्षणा नंतर परदेशात मुलाखत दिली, त्यानंतर त्यांची डेनमार्क देशातील पोस्ट डॉक्टरेट फेलो पदावर नियुक्ती झाली आहे, ‘मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी’ या घोषवाक्या प्रमाणे त्यांच सरसम येथिल माहेर असुन नांदेड सासर आहे, डॉ. क्रांती सदाशिव कांबळे उर्फ डॉ. क्रांती मिलींद लोकडे माहेरच्या नावाबरोबर सासरच नावही मोठ होतांना दिसत आहे. हाच दोन्ही घरचा शैक्षणिक प्रकाश आहे. आई वडिलांनी मेहनतीतुन दिलेल शिक्षण डॉ. क्रांती यांनी मिळवलेल्या यशाच कौतुक केल जात आहे.
निवडी नंतर येथिल बौध्द विहारातील छोटेखानी कार्यक्रमात गटप्रवर्तक पौर्णिमा कांबळे, आशाताई जयमाला कांबळे, अंगणवाडी सेविका सुरेखा कांबळे, ममताबाई गोखले, राहुल कांबळे, पत्रकार विजय वाठोरे, बालाजी गोखले, मीराताई दवणे, अविनाश गोखले, गौतम कवडे आदिंनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.