हिमायतनगर। तालुक्यातील सरसम येथे गैर मार्गाने अवैद्य रित्या गर्भपात करण्यात येत असल्याच्या माहिती वरून आरोग्य विभाग पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणातील आरोपी फरार असल्याने जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता परंतु न्यायालयाने सदर आरोपीचा अटकपुर्व जामीन नामंजुर केला आहे.
सरसम येथिल सुरेखाई नगर भागात अवैद्य रित्य बनावट वैद्यकिय व्यवसायीका कडुन गर्भपात केला जात असल्याची माहिती काहि दिवसा पुर्वी सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी वैभव नखाते यांना मिळाली होती, बनावट वैद्यकिय व्यवसायीकाच्या हालचालीवर लक्ष ठेवुन असतांनाच दि. १३ ऑगष्टला या भागातील अवैद्य गर्भपाताचा संशय बळावल्याने सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. वैभव नखाते यांनी कारवाई केली दरम्यान संबंधितास सुगावा लागल्याने बनावट वैद्यकिय व्यवसाईकासह गर्भपात करण्याकरीता आलेल्या दोन महिला, एक मुलगी या ठिकाहुन पसार झाल्या.
संबंधीत घराची तपासणी केली असता गर्भपाता करीता वापरले जाणारे Mtp किट, भुल देण्याचे इंजक्शन, सर्जिकल साहित्य मिळुन आले डॉ. वैभव नखाते यांनी दिलेल्या फिर्यादि वरून प्रथम खबरी अहवाल क्र. २१३/२०२४ नुसार संशयीत आरोपी पंडीत काळुराम वाठोरे याचे विरूध्द भारतीय नागरीक सुरक्षा संहितेचे कलम ४८२, भारतीय न्याय संहितेचे कलम ८८ , ६३ , ३ (५) , महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसायीक कायदा कलम ३३ (अ) , ३३ (२) नुसार गुन्हा दाखल झाल्या पासुन आरोपी फरार आहे, पोलिसां कडुन आरोपीचे शोध कार्य सुरू असतांना दरम्यान आरोपीचे वकील विधितज्ञ कदम यांनी जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे अटकपुर्व जामीन मिळण्याचा अर्ज केला होता परंतु न्यायालयाने अटकपुर्व जामीन नामंजुर केला.