हिमायतनगर (गोविंद गोडसेलवार) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी हे मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणाहुन ये-जा करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावं लागत आहे. कार्यालयात चकरा म्रुणाही कामे होत नसल्याच्या असंख्य तक्रारी वाढल्या आहेत. हि बाब लक्षात घेऊन प्रहार संघटनेने बुधवार दिनांक 28 रोजी तहसीलदार पल्लवी टेमकर याना निवेदन देऊन मुख्यालयी न राहणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अन्यथा प्रहार संघटना जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उरणार असल्याचा इशाराही दिला आहे.
देण्यात आलेल्या निवेदन म्हंटले आहे की, हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व शैक्षणिक विद्यार्थी यांचे अनेक कामे हे ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी हे त्यांना नेमुण दिलेल्या ठिकाणी राहात नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. व त्यांच्या अभावी कांही जणांची कामे तशीच खोळंबुन आहेत. तर कांही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नसल्यामुळे शिक्षणांपासून वंचित सुध्दा राहावे लागलेले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, समिती हिमा कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी, व पंचायत समिती, तहसील कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय, येथील कर्मचारी व अधिकारी हे सुध्दा आपल्या सोयीनुसार रेल्वेच्या वेळापत्रकानुसार भोकर नांदेड – हिंगोली व त्यांच्या सोयीनुसार ये जा करीत आहेत, त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील नागरीकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना व विद्यार्थ्यांना अत्यंत गैरसोयींना तोंड दयावे लागत आहे.
तरी वरील सर्व प्रकारची अडचण लक्षात घेऊन निवेदनाची योग्य ती दखल घेवून कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करुन प्रहार जनशक्ती आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड, उपविभागीय अधिकारी साहेब, हदगांव, गट विकास अधिकारी, पं. स. हिमायतनगर, तालुका कृषि अधिकारी, हिमायतनगर याना देण्यात आले आहे. या निवेदनावर प्रहार तालुकाध्यक्ष दत्ता पंडीतराव देशमुख, दत्ता तुकाराम आंबेपवाड, संगपाल नामदेव प्रधान आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.