हिमायतनगर – सरसम बु येथिल शेतकरी धार्मिक गृहस्थ दिगांबर भुसारे वय ६५ वर्ष हे प्रयागराज येथे मौनी अमावस्ये निमित्त परीवारातील व्यक्तींसोबत शाही स्नान व देवदर्शनासाठी गेले होते परंतु त्यांची तेथे प्रकृती खालावल्याने स्वरूप राणी नेहरू हॉस्पिटल शासकीय रूग्णालय प्रयागराज येथे अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आले होते, दरम्यान उपचार सुरू असतांना दि. २९ सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे पार्थिव शववाहिनीने ३० जानेवारी गुरूवारी सरसम बु येथे सकाळी ७:०० वाजता पोहचले असुन दुपारी १२:०० वाजता अंतिम संस्काराचे सोपस्कार पुर्ण करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुन, नातु,पंतु असा मोठा परीवार आहे. ते तरूण शेतकरी शिवाजी भुसारे व अंगणवाडी ताई प्रयागबाई भुसारे यांचे वडील तर उमेश कल्याणकर याचे आजोबा होत.
