हिमायतनगर। तालुक्यातील सरसम येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी वैभव नखाते यांच्या आरोग्य सेवेची दखल घेत सकाळ माध्यम समुहाने नुकताच एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरव करत सन्मान केल्याने डॉ नखाते यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत असुन आरोग्यप्रेमी नागरीकांकडुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. वैभव नखाते काही वर्षा पासुन आरोग्य सेवा करतात, नौकरी म्हणुन याकडे न पहाता रूग्णांना चांगल मार्गदर्शन करत चांगले उपचार करून पुढील उपचाराचा सल्ला, आरोग्यदायी योजनांचा लाभ कुठुन कसा घ्यायचा हे ही समजुन सांगतात, लहान असो वा मोठा कुठलाही भेद ते करत नाहीत, त्यांच्या स्वभावामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांचा ओघही वाढलेला आहे, दवाखाण्यात हजर असतांना वेळेच बंधन न ठेवता ते सतत सेवा देतात, त्यांनी केलेल्या उपचारातुन हजारो रूग्ण व्याधीमुक्त झाले आहेत. यामुळे डॉ. नखाते यांनी सर्वसामान्य रूग्णांच्या ह्रदयात जागा निर्माण केली आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत सकाळ माध्य समुह व मंथन इन्फ्रा केअर यांच्या सहकार्याने मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या २४ डॉक्टरांचा एका कार्यक्रमात नुकताच कार्य गौरव करत सन्मान करण्यात आला, याच कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते डॉ. नखाते यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.
यामुळे नखाते यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत असुन माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, विनय देशमुख, यांनी यथोचीत सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रापस मारोतराव मोरे, नागोराव सुर्यवंशी, सखाराम चव्हाण, सागर नगराळे, दवाखाण्यातील कर्मचारी, रूग्णांची उपस्थिती होती.