विळ्याच्या आणीवर आईने मुल वाढवली – घडवली
हिमायतनगर – गोविंद गोडसेलवार
अगदी पाच वर्ष वय असतांना वडीलाच अकाली निधन व्हाव, एैन उमेद आई वनिताबाई ह्यांनी लहान पोरांच्या चेहऱ्यावर भविष्य शोधत, विळ्याच्या आणीवर कुटूंब चालवाव, पुढे तीचा मुलगा वशील्याविना पोलिसात भर्ती व्हावा, कुणी म्हणेल आईची छाती अभिमानाने फुलुन आली, कुठलाच लवलेश नाही, येथे कष्टाच चिज झाल्यान ती मनातच पुटपुटावी, आनखी मोठा हो… हे काही कथानक, काल्पनिक कथा नाही, हि वास्तव बातमी आहे, सरसम ता. हिमायतनगर येथिल रोहित बिच्चेवारच्या यशाची.
अस म्हणतात काळ कठोर झाला की नियती डाव साधते परंतु तस काही नाही, जिद्द, चिकाटी, मेहनत, परस्थितीची जाणीव झाली की माणुस निश्चित यश प्राप्त केल्या शिवाय थांबत नाही, यश त्यामागे धावत येत.कठोर काळासोबत ते लढले घडलेही.

सरसम ता. हिमायतनगर येथिल रोहित संदिप बिच्चेवार याच पहिले ते सातवी पर्यंतच शिक्षण जिल्हा परीषद शाळा सरसम येथे पुर्ण झाल, पुढे येथिल देशमुख विद्यालयातुन दहावी उतीर्ण होवुन, महाविद्यालयीन शिक्षण हिमायतनगरच्या हुजपा कॉलेजमध्ये झाल, नांदेड येथे पोलिस बनण्याच्या तयारीसह अन्य स्पर्धा परीक्षाची तयारी करत होता, खाजगी शिकवणी, महागड्या अकॅडमी, अभ्यासिकांचा खर्च झेपावत नसल्याने तो या भानगडीत पडला नाही, मात्र अकॅडमीचे संचालक यशस्वी रोहितच नाव खपवण्याचा प्रयत्न करत आहेत, मित्र, स्वत: कडील उपलब्ध पुंजीवर त्याने परस्थितीचा बाऊ न करता सतत अभ्यास, व्यायाम, मैदानी सराव सुरू ठेवला, त्यास लेखी परीक्षेत ८७ गुण, मैदानी गुण ४१ एकुण १२८ गुण संपादन करून ओबिसी प्रवर्गातुन, २१ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात त्याने नांदेड पोलिस भर्तीत यश मिळवल आहे.
रोहितची कहाणी काही एखाद्या कथानका पेक्षा वेगळी नाही, अगदी पाच वर्ष वय असतांना रोहितचे वडील वारले, रोहित व लहान भाऊ गौरव या दोघांकडे पाहत आईने अक्षरश: विळ्याच्या आणीवर दिवस काढलेत, रोजमजुरी करून मुलांच उदरभरण, शिक्षण, घर चालवाव, कधी कुणाजवळ परस्थिबद्दल ब्र देखिल काढला नाही, आपण केलेल्या कष्टामुळ मुलगा पोलिस बनला हा अभिमान आई वनिताच्या विचारांना शिवला नसावा, अगदी रोजच्याच गर्तेत ती दिसुन आली, पुढे आनखी मोठा हो, अभिमान तरी कुणासाठी बाळगावा काल पर्यंत परस्थितीशी लढत होती, यापुढेही किती लढाव लागेल याच विचारात ती आई असावी.
रोहित पोलिस झाल्याची वार्ता आप्तस्वकिय मित्र परीवारा पर्यंत पोहचल्या पासुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पहिल्यांदा सरसम गावी परतताच जवळच्या मित्रांनी डिजे गुलालाची उधळण करत घरी पोहचवल, रोहितला ओवाळतांना आई वनिता आनखी खंबीर झाली, मोठा मुलगा पोलिस झाला, आता लहानग्याचा गौरव पहायचा आहे, याच आशेवर ती दिसली.
